प्रलंबित प्रश्न न सुटल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:23+5:302021-02-09T04:19:23+5:30
परभणी : कोषागार कार्यालयाकडून वेतन मिळावे, यासह इतर प्रलंबित प्रश्न एक महिन्याच्या आत न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ...

प्रलंबित प्रश्न न सुटल्यास आंदोलन
परभणी : कोषागार कार्यालयाकडून वेतन मिळावे, यासह इतर प्रलंबित प्रश्न एक महिन्याच्या आत न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी संघटने दिला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ७ फेब्रुवारी रोजी बी. रघुनाथ सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे नेते के. के. आंधळे होते़. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डी. पी. शिंदे, आनंद मोरे, मराठवाडा अध्यक्ष भाले पाटील, नितीन ईजाते, चंद्रकांत पवार, मिर शाकेर अली, केशव दौडे, भगवान शिंदे, उमेश आर्दड, के. डी. जोशी, अनिल समिंद्रे, बाबर खान, डी. बी. देवकर, संकीर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव, दिनकर काकडे, विष्णू सावंत, लक्ष्मण नंदाने, मुन्तजीब खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राज्य कर्मचारी संघटनेचे नेत र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली़ प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी कोषागार कार्यालयाकडून वेतन मिळण्याबाबत मागणी केली़ २०२०ची सेवाज्येष्ठता यादी तयार करून कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत चर्चा करण्यात आली़ निवृत्तिवेतन व रजा रोखीकरणाच्या रक्कम शासनस्तरावरून भरण्यात याव्यात़, उर्वरित रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, २००५नंतर आस्थापनेवरील आकृतीबंध आराखडा वाढवून मिळावा़, स्वच्छता निरीक्षकांचे तत्काळ समावेशन करण्यात यावे़ नगर परिषदेतील आकृतीबंध आराखडा वाढवून स्वच्छता कामगारांसह उर्वरित कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे़ आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत चर्चा झाली. एक महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला़