शाळेतील चित्रपट दाखविण्याच्या यंत्रासह माऊस चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:44+5:302021-04-13T04:16:44+5:30
सेलूतील हमालवाडी जि. प. शाळेला ई-लर्निंग शिक्षणांतर्गत २० जुलै २०२० रोजी जिल्हा परिषदेकडून १ लाख ३३ हजार २०० रुपयांचे ...

शाळेतील चित्रपट दाखविण्याच्या यंत्रासह माऊस चोरीला
सेलूतील हमालवाडी जि. प. शाळेला ई-लर्निंग शिक्षणांतर्गत २० जुलै २०२० रोजी जिल्हा परिषदेकडून १ लाख ३३ हजार २०० रुपयांचे विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्याचे यंत्र (ऑक्सिस्मार्ट टिचिंग डिवाईस), संगणकाचा माऊस व अन्य साहित्य मिळाले होते. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. परंतु घनवन प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी मुख्याध्यापक भुजंग महादेव थोरे, शिक्षक गजानन सांभाराव बाहेगव्हाणकर, संघमित्रा केरबा वाघमारे हे शाळेत जात असतात. ६ एप्रिलरोजी मुख्याध्यापक थोरे हे शाळेत गेले असता, त्यांना ई-लर्निंग वर्गखोलीचे कुलूप तुटलेले दिसले. ही माहिती त्यांनी सहकारी शिक्षकांना दिली. त्यानंतर त्यांनीखोलीत जाऊन पाहिले असता १ लाख ३३ हजार २०० रुपयांचे चित्रपट दाखविण्याचे यंत्र व १ हजार ५५० रुपयांचा वायरलेस माऊस गायब असल्याचे दिसले. या साहित्याचा त्यांनी इतरत्र शोध घेतला असता, ते मिळून आले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक थोरे यांनी याबाबत सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध १० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.