गंगाखेडच्या उपनगराध्यक्षा विरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:42 IST2018-12-20T14:40:53+5:302018-12-20T14:42:54+5:30
विश्वास प्रस्ताव सतरा विरुद्ध शुन्य मताने मंजूर करण्यात आला.

गंगाखेडच्या उपनगराध्यक्षा विरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर
गंगाखेड (परभणी ) : नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर आज सकाळी ११ वाजता बाळासाहेब ठाकरे सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शिंदे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव सतरा विरुद्ध शुन्य मताने मंजूर करण्यात आला.
या प्रस्तावावर काँग्रेसच्या ५, राष्ट्रवादी काँग्रेस ६, भाजपाच्या ४, अपक्ष १ व नगराध्यक्ष तापडिया यांनी अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले. तर यावेळी काँग्रेसच्या गटनेत्या शैलाताई गोविंद ओझा, ज्योती नितीनकुमार चौधरी व राजश्री भिमाशंकर दामा हे तीन सदस्य अनुपस्थित राहिले. यामुळे हा प्रस्ताव सतरा विरुध्द शुन्य मताने मंजूर करण्यात आला.