बसपोर्टच्या कामाचे मिळेनात पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:52+5:302021-04-17T04:16:52+5:30
रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी परभणी: मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत शंभरहून अधिक कामे सुरू आहेत. ...

बसपोर्टच्या कामाचे मिळेनात पैसे
रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी परभणी: मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत शंभरहून अधिक कामे सुरू आहेत. मात्र या रस्त्यांची कामे करताना संबंधित कंत्राटदारांकडून निवेदित दिलेल्या नियम व अटींना खो दिला जात आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाणी पुरवठा विहिरींची कामे संथ गतीने
परभणी: सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत खोदण्यात येणाऱ्या विहिरींची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या योजनेला येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे विभागीय आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कलावंतांवर उपासमारीची वेळ
परभणी: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे कलावंतांच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील कलावंतांमधून होत आहे.