विकासकामांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST2021-02-25T04:20:45+5:302021-02-25T04:20:45+5:30

बाजारपेठेतील गर्दी कमी होईना परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन उपाययोजना करीत असले तरी अद्यापपर्यंत बाजारपेठ भागातील गर्दी ...

Moment of development work | विकासकामांना लागेना मुहूर्त

विकासकामांना लागेना मुहूर्त

बाजारपेठेतील गर्दी कमी होईना

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन उपाययोजना करीत असले तरी अद्यापपर्यंत बाजारपेठ भागातील गर्दी कमी झालेली नाही. शहरात फिरणारे काही नागरिक मास्कचा वापर करीत असले तरी फिजिकल डिस्टन्सच्या बाबतीत मात्र पालन होत नाही. गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळे, आठवडे बाजार बंद केला आहे. मात्र बाजारपेठ भागातील गर्दीकडे दुर्लक्ष होत आहे.

बसस्थानक भागात सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात असुविधा असून, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा बसस्थानकावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसपोर्टचे काम लवकर पूर्ण होणार नसल्याने किमान तात्पुरत्या बसस्थानकात सुविधा तरी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

रसवंत्या, शितगृहे पुन्हा सुरू

परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून, उन्हापासून बचाव करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू झाल्या आहेत. शहरात रसवंत्य, शीतगृहे सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आईस्क्रीम पार्लर चालकांनीही तयारी सुरू केली असून, उन्हाळ्यात आईस्क्रीमला मागणी असल्याने साठा वाढविला आहे.

वाहनधारकांच्या अडचणी खड्ड्यांमुळे वाढल्या

परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील रस्ते खराब झाल आहेत. कच्छी बाजारातून जनता मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. या अरुंद रस्त्यावर आधीच वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यातच खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपाने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

उद्यानातील लॉन पाण्याअभावी वाळली

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील लॉन पाण्याअभावी वाळली आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले असले तरी उद्यानाच्या व्यवस्थापनाबाबत अद्याप ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. मागील काही महिन्यांपासून लॉनसाठी पाण्याचे व्यवस्थापन केले नसल्याने ही लॉन वाळली आहे. परिणामी उद्यान ओसाड बनले आहे.

बसफेऱ्या अभावी ग्रामस्थांची गैरसोय

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी महामंडळाने बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागातील बसफेऱ्या प्रवासी मिळत नसल्याने सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Moment of development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.