मोकाट कुत्र्यांना कोंडवाड्याचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:29+5:302021-04-08T04:17:29+5:30

दर्गा रोड परिसरातील काजी बाग, गालिब नगर, आसेफ कॉलनी, पारवा रोड, अन्सार कॉलनी या परिसरात मागील काही दिवसांपासून ...

Mokat dogs to Kondwada road | मोकाट कुत्र्यांना कोंडवाड्याचा रस्ता

मोकाट कुत्र्यांना कोंडवाड्याचा रस्ता

दर्गा रोड परिसरातील काजी बाग, गालिब नगर, आसेफ कॉलनी, पारवा रोड, अन्सार कॉलनी या परिसरात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला होता. लोकश्रेय मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी यासंदर्भात महानगरपालिकेकडे तक्रार नोंदविली. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले आहे. तेव्हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी इनामदार यांनी केली होती. त्याची दखल घेत महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाचे प्रमुख विनय ठाकूर व त्यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी या भागात कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली. याप्रसंगी सलीम इनामदार यांच्यासह निवृत्त कृषी अधिकारी सय्यद मोहियोद्दिन, वाहन चालक सय्यद सरफराज, बाबा जाधव, आकाश जाधव, मोहन गायकवाड बाबू नंद आदींची उपस्थिती होती.

Web Title: Mokat dogs to Kondwada road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.