परभणीत राष्ट्रीय महामार्गावरील मोबाईल शॉपी फोडली; ५० लाखांहून अधिक साहित्य चोरल्याचा अंदाज

By राजन मगरुळकर | Updated: May 22, 2025 08:42 IST2025-05-22T08:41:47+5:302025-05-22T08:42:48+5:30

बुधवारी मध्यरात्री घडला प्रकार 

mobile shop on national highway in parbhani broken into estimated to have stolen more than 50 lakhs of mobile and materials | परभणीत राष्ट्रीय महामार्गावरील मोबाईल शॉपी फोडली; ५० लाखांहून अधिक साहित्य चोरल्याचा अंदाज

परभणीत राष्ट्रीय महामार्गावरील मोबाईल शॉपी फोडली; ५० लाखांहून अधिक साहित्य चोरल्याचा अंदाज

राजन मंगरूळकर, परभणी : शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी मध्यरात्री एक ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान एस. एस. मोबाईल शॉपी नावाच्या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. दुकानाच्या पाच शटरपैकी एक शटर वाकून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची बाब गुरुवारी सकाळी समोर आली आहे.

दुकानाचे मालक योगेश झरकर यांच्यासह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते.  गुरुवारी सकाळी घटनेची माहिती झाल्यानंतर साडेसात वाजेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आणि संबंधित दुकान मालक योगेश झरकर हे आले होते. त्यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दुकानातील तपासणी करण्याचे काम सुरू होते. दरम्यान बुधवारी रात्री साडेनऊपासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत परभणी शहरात पावसाची हजेरी सुरू होती. याच कालावधीत अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर मध्यरात्री पाऊस थांबल्यावर वीजपुरवठा सुरळीत झाला. खंडित वीज पुरवठ्याचा किंवा अंधाराचा फायदा घेऊन चोरीचा प्रकार झाला असावा असा अंदाज आहे. 

विविध कंपन्यांचे मोबाईल एकाच छताखाली

एस.एस.मोबाईल शॉपी नावाने असलेल्या वसमत महामार्गावरील मोबाईल दुकानात एकाच छताखाली विविध कंपन्यांचे मोबाईल विक्री केले जातात. भारतातील सर्वात मोठी ब्रँड मोबाईल शॉपी ओळखली जाते. यामध्ये परभणीतील चोरीच्या घटनेत साधारण ५० लाखापेक्षा जास्त मुद्देमाल चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. या चोरीमुळे परभणी जिल्हा पोलीस दलासमोर चोरटे शोधण्याचे आणि तपासाचे आव्हान आहे. 

तिघांना नागरिकांनी होते हटकले 

सकाळी घटनास्थळी दाखल झालेल्या परिसरातील काही नागरिकांची चोरीच्या प्रकाराबाबत चर्चा सुरू होती. रात्री अंधारामध्ये काहीजण आजूबाजूला असताना त्यांना इथे काय करत आहात असे म्हणून हटकले होते, अशी माहिती काही नागरिकांनी बोलून दाखविली.

Web Title: mobile shop on national highway in parbhani broken into estimated to have stolen more than 50 lakhs of mobile and materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.