विकासकामांसाठी आमदार गुट्टे यांचे जिल्हा कचोरीसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:38+5:302021-04-13T04:16:38+5:30

गंगाखेड शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील १२ वर्षांपासून रखडले आहे. हे काम झाले नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. दिवसभरात ...

MLA Gutte's fast in front of District Court for development works | विकासकामांसाठी आमदार गुट्टे यांचे जिल्हा कचोरीसमोर उपोषण

विकासकामांसाठी आमदार गुट्टे यांचे जिल्हा कचोरीसमोर उपोषण

गंगाखेड शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील १२ वर्षांपासून रखडले आहे. हे काम झाले नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. दिवसभरात रेल्वेच्या या ठिकाणाहून २२ फेऱ्या होतात. त्यामुळे दिवसभरामध्ये केवळ चार तास रेल्वे गेट सुरू राहते. रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, मुळी बंधाऱ्याचे काम त्वरित पूर्ण करावे, गंगाखेड मतदारसंघातील ९८ गावांना मुख्य रस्त्याला जोडणारी प्रस्तावित कामे मंजूर करून निधी उपलब्ध करावा, जलसिंचन करण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती करून हेड ते टेलपर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी गुट्टे यांनी सोमवारी उपोषण केले. यावेळी किशनराव भोसले, राजेश फड, ॲड. संदीप अळनुरे, माधवराव गायकवाड, रवि कांबळे, हनुमंत मुंडे, शंभूदेव फड, सत्यपाल साळवे, हनुमंत लटपटे, राधाकिशन शिंदे, लक्ष्मण मुंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: MLA Gutte's fast in front of District Court for development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.