व्यापाऱ्यांच्या बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:27+5:302021-02-27T04:23:27+5:30
मानवत येथेही बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील किराणा, औषधी, कापड, किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. व्यापारी ...

व्यापाऱ्यांच्या बंदला प्रतिसाद
मानवत येथेही बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील किराणा, औषधी, कापड, किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. व्यापारी महासंघाच्या वतीने दुपारी १२ वाजता तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, संजय लड्डा, कृष्णा बाकळे, सतीश हापसेनकर, शैलेश काबरा, उमेश लवंडे आदींची उपस्थिती होती.
सोनपेठ येथेही बंदला प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर संतोष निर्मळे, संजय काबरा, केशव भोसले, केदार वलसेटवार, अश्रोबा खरात, सतीश मुळी, तुषार देशमुख, विष्णूपंत दहिवाल, विजयानंद शेटे आदीची उपस्थिती होती.
जिंतूर येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील खते, बियाणे, औषधी दुकाने १०० टक्के बंद होती. दुपारी १२ वाजता व्यापारी महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अध्यक्ष रमेश दरगड, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, सत्यनारायण शर्मा, सुनील तोष्णीवाल, गणेश कुऱ्हे, कैलास थिटे, प्रदीप कोकडवार, बालाजी सांगळे, सचिन देवकर, ताज शेख, बाबा खान, प्रकाश सोनी आदींची नावे आहेत.
गंगाखेडमध्ये व्यवहार सुरळीत
जिल्ह्यातील विविध भागात बंद पुकारण्यात आला असला तरी शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी या बंदमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे येथील बाजारपेठेत सर्व व्यवहार सुरळीत झाले. व्यापारी महासंघात येेथे दोन गट पडले आहेत. एका गटाने सोशल मीडियावरुन बंदचे आवाहन केले होते; परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.