परभणीतील गांधी पार्क येथील अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 03:02 PM2017-12-13T15:02:36+5:302017-12-13T15:04:37+5:30

शहरातील गांधी पार्क भागात विना परवाना केलेल्या बांधकामावर मनपाच्या पथकाने आज दुपारी १२ च्या सुमारास कारवाई केली. यावेळी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत ते उद्ध्वस्त करण्यात आले.

MC hammer on the unauthorized construction of Gandhi Park in Parbhani | परभणीतील गांधी पार्क येथील अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

परभणीतील गांधी पार्क येथील अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

googlenewsNext
ठळक मुद्देगांधी पार्क भागातील मोहम्मद अजगर हुसेन यांनी पानवाला बिल्डींगच्या बाजुस विना परवानगी बांधकाम केले होते़ मनपाच्या वतीने सदरील बांधकाम काढून घेण्याच्या अनुषंगाने नोटीसही दिली होती़

परभणी : शहरातील गांधी पार्क भागात विना परवाना केलेल्या बांधकामावर मनपाच्या पथकाने आज दुपारी १२ च्या सुमारास कारवाई केली. यावेळी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत ते उद्ध्वस्त करण्यात आले.

शहरातील गांधी पार्क भागातील मोहम्मद अजगर हुसेन यांनी पानवाला बिल्डींगच्या बाजुस विना परवानगी बांधकाम केले होते़ तसेच अतिक्रमणही केले होते़ या संदर्भात त्यांना मनपाच्या वतीने सदरील बांधकाम काढून घेण्याच्या अनुषंगाने नोटीसही दिली होती़ परंतु, त्यांनी बांधकाम काढून घेतले नाही, तसेच  अतिक्रमणही हटविले नाही़ त्यामुळे मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरी यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास कारवाई करीत सदरील बांधकाम पाडले़ विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच या बांधकामांतर्गत स्लॅब टाकण्यात आला होता व सद्यस्थितीत हे काम सुरूच होते.

Web Title: MC hammer on the unauthorized construction of Gandhi Park in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी