परभणीतील गांधी पार्क येथील अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:04 IST2017-12-13T15:02:36+5:302017-12-13T15:04:37+5:30
शहरातील गांधी पार्क भागात विना परवाना केलेल्या बांधकामावर मनपाच्या पथकाने आज दुपारी १२ च्या सुमारास कारवाई केली. यावेळी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत ते उद्ध्वस्त करण्यात आले.

परभणीतील गांधी पार्क येथील अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा
परभणी : शहरातील गांधी पार्क भागात विना परवाना केलेल्या बांधकामावर मनपाच्या पथकाने आज दुपारी १२ च्या सुमारास कारवाई केली. यावेळी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत ते उद्ध्वस्त करण्यात आले.
शहरातील गांधी पार्क भागातील मोहम्मद अजगर हुसेन यांनी पानवाला बिल्डींगच्या बाजुस विना परवानगी बांधकाम केले होते़ तसेच अतिक्रमणही केले होते़ या संदर्भात त्यांना मनपाच्या वतीने सदरील बांधकाम काढून घेण्याच्या अनुषंगाने नोटीसही दिली होती़ परंतु, त्यांनी बांधकाम काढून घेतले नाही, तसेच अतिक्रमणही हटविले नाही़ त्यामुळे मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरी यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास कारवाई करीत सदरील बांधकाम पाडले़ विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच या बांधकामांतर्गत स्लॅब टाकण्यात आला होता व सद्यस्थितीत हे काम सुरूच होते.