परभणीमध्ये वसमत रस्त्यावर गोडाऊनला भीषण आग; धुराचे लोट पसरले, रस्यावर बघ्यांची गर्दी
By राजन मगरुळकर | Updated: July 24, 2025 18:26 IST2025-07-24T18:26:20+5:302025-07-24T18:26:38+5:30
वसमत महामार्गावरील आगीच्या घटनेनंतर परभणीतील नागरिकांनी घटनास्थळीत मोठी गर्दी केली आहे

परभणीमध्ये वसमत रस्त्यावर गोडाऊनला भीषण आग; धुराचे लोट पसरले, रस्यावर बघ्यांची गर्दी
परभणी : शहरातील वर्दळीच्या वसमत रस्त्यावर एका दुकानाच्या गोडाऊनला आग लागल्याची गंभीर घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन यासह शहर वाहतूक शाखा आणि नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले आहे. ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.
तिसऱ्या मजल्यावर गोडाऊनला लागल्याने धुराचे लोट वसमत महामार्ग परिसरात पसरले आहेत. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांसह अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. साधारण दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी ही आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान आणि वाहन दाखल झाले असून संबंधित परिसरातील गर्दी हटविण्यासाठी पोलीस व अग्निशामन दल प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दुकानाच्या परिसरात नागरी वसाहत आणि भाजीपाला बाजारपेठ असल्याने आजूबाजूच्या परिसरातही आगीचे लोट पसरले आहेत.