लग्नाची बोलणी फिस्कटली, तरुणाने मुलीच्या मामाच्या गावीच संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 16:17 IST2021-06-25T16:14:37+5:302021-06-25T16:17:19+5:30

काही दिवसांपूर्वी एमपीएससीची माहिती मिळणाऱ्या एका टेलिग्राम ग्रुपवरून दोघांची ओळख झाली

Marriage talks fizzled out, the young man ended his life in the girl's uncle's village | लग्नाची बोलणी फिस्कटली, तरुणाने मुलीच्या मामाच्या गावीच संपवले जीवन

लग्नाची बोलणी फिस्कटली, तरुणाने मुलीच्या मामाच्या गावीच संपवले जीवन

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेची तयारी करताना सोशल मीडियातून जुळले प्रेम

देवगावफाटा ( परभणी ) : प्रेमसंबंध असलेल्या मुलीसोबत लग्न होत नसल्याचे लक्षात येताच तरुणाने नैराश्यात विषारी द्रव्यप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 23 जूनला रात्री सेलू येथील राजाराम नगर येथे घडली. स्वप्निल घाडगे असे मृत तरुणाचे नाव असून मुलीच्या मामाच्या गावी लग्नाची बोलणी करण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी 24 जून रोजी कलम 174 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, स्वप्नील घाडगे ( 20 ) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सोगाव येथील रहिवासी आहे. तो एमपीएससीची तयारी करायचा. काही दिवसांपूर्वी एमपीएससीची माहिती मिळणाऱ्या एका टेलिग्राम ग्रुपवरून त्याची बीड जिल्ह्यातील वडवणी येथील एका मुलीसोबत ओळख झाली. अभ्यासाच्या बोलण्यातून त्यांचे प्रेम फुलत गेले. दोघांनीही नातेवाईकांची संमती घेऊनच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्वप्नील याने सेलू येथील मुलीच्या मामासोबत संपर्क करून लग्नाची बोलणी करण्यासाठी स्वतःचे मामा विष्णू गोंडगे यांना घेऊन आला.

राजाराम नगर येथे २३ जुने रोजी लग्नाची बोलणी सुरु होती. मात्र लग्नाची बोलणी फिस्कटल्याने नैराश्यात स्वप्नील याने राजाराम नगर येथेच एका बांधकाम सुरु असलेल्या जागेवर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटीतीर्थवाले, जमादार एस एस वासलवार, पोहेकॉ बी.जि. पुरणवाड यांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कलम 174 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार एस. एस. वासलवार हे करीत आहेत.

Web Title: Marriage talks fizzled out, the young man ended his life in the girl's uncle's village