लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण, असे म्हणत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कार घेण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत व चारित्र्यावर संशय घेऊन नवरा सचिन पंढरीनाथ घुले, सासू रुक्मिणबाई लक्ष्मण घुले, सासरा पंढरीनाथ गणपत घुले, ललिता पंढरीनाथ घुले (सर्व रा. बीबीनगर ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) यांनी संगनमत करून लग्न झाल्यानंतर एक वषार्पासून पूजा सचिन घुले (रा. हडपसर पुणे ह.मु. दस्तगीर मोहल्ला गंगाखेड) यांचा छळ केला. सासरी व माहेरी नेहमी मारहाण, शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे, अशी फिर्याद पूजा घुले यांनी ६ मार्च रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. यावरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुलक्षण शिंदे करीत आहेत.
परभणीत दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:37 IST