दुसऱ्या दिवशीही बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:30+5:302021-04-19T04:15:30+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीसह काही निर्बंध घातले आहेत. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने आणि गर्दी होत ...

दुसऱ्या दिवशीही बाजारपेठ कडकडीत बंद
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीसह काही निर्बंध घातले आहेत. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने आणि गर्दी होत असल्याने शनिवारपासून बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेत मोडणारी किराणा दुकाने आणि भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. या निर्णयाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहिली. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ ही बऱ्यापैकी कमी झाली होती. रविवारीदेखील असाच अनुभव आला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने आणि बाहेर उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्याची टाळले. रस्त्यावर तुरळक वाहतूक दिवसभर दिसून आली बाजारपेठेत मात्र पूर्णतः शुकशुकाट होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता आणखी काही दिवस नागरिकांना प्रशासनाचे निर्बंध गांभीर्याने पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार १ मेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. हा निर्णय घेताना नागरिकांच्या भाजी आणि किराणा साहित्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. रविवारी काही भाजीविक्रेत्यांनी वसाहतींमध्ये फिरून भाजीविक्री केली. मात्र किराणा दुकाने पूर्णतः बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आणखी काही दिवस नागरिकांना किराणा साहित्याच्या खरेदीला मुरड घालावी लागणार आहे.