Maratha Kranti Morcha : गंगाखेड दुसऱ्या दिवशीही बंद; पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:12 IST2018-07-24T15:17:51+5:302018-07-24T16:12:55+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा सकल समाज बांधवांच्या वतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी शहरात बंद होता.

Maratha Kranti Morcha : गंगाखेड दुसऱ्या दिवशीही बंद; पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू
गंगाखेड (परभणी ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा सकल समाज बांधवांच्या वतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी शहरात बंद होता.
सोमवारी बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी खाजगी वाहनांसह राज्य परिवहन मंडळाच्या वाहनांची मोठया प्रमाणात तोडफोड करत जाळपोळ केली. याबाबत सपोनि सुरेश थोरात यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड, ईसाद, पडेगाव, पिंप्री (झोला), मालेवाडी, महातपुरी, खडका ता.सोनपेठ, मुळी, मसला, मिरवट ता.परळी, रावराजुर ता.पालम, खंडाळी, पोहँडुळ ता.सोनपेठ, उक्कडगाव ता.सोनपेठ, अवलगाव ता.सोनपेठ, पोखर्णी नृ. ता.परभणी, खळी, मैराळसांवगी, सुनेगाव, धारासुर, कापसी ता. पालम, उखळी आदी गावांतील २०० ते २५० जणांविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, १०९, ३४१, ३२४, ३३६, ४२७, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कलम ३, क्रिमिनल लॉ कलम ७ आदी कलामांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी सोमवार दुपारनंतरच कोंबिंग ऑपरेशन सुरुवात करण्यात आली. यात जानकीराम पवार, नितीन पांचाळ, माधव शिंदे, धिरज जगलपुरे, प्रभाकर भोसले, बाळासाहेब दिडशेरे, गोपाळ सातपुते, लहू जाधव, हनुमान पवार, सोमनाथ भिसे, गोविंद निरस, नितीन चव्हाण, दत्तात्रय यादव, मंगेश जाधव, गोविंद पवार, विठ्ठल देवकते, वैजनाथ जाधव आदी पंचवीस जणांना आज दुपारी एक वाजेपर्यंत ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे करत आहेत.