कुशल कर्मामुळे मानवाची धम्माकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST2020-12-06T04:18:09+5:302020-12-06T04:18:09+5:30
पूर्णा : बुद्ध धम्मामध्ये कर्म सिद्धांताला अनन्य साधरण महत्व आहे. चार आर्य सत्य व आर्य आष्टांगीक मार्ग याचे पालन ...

कुशल कर्मामुळे मानवाची धम्माकडे वाटचाल
पूर्णा : बुद्ध धम्मामध्ये कर्म सिद्धांताला अनन्य साधरण महत्व आहे. चार आर्य सत्य व आर्य आष्टांगीक मार्ग याचे पालन केल्यास निश्चितपणे संपूर्ण मानव जातीच्या सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कुशल कर्मामुळे मानव सद् धम्माकडे वाटचाल करीत असतो, असे प्रतिपादन भंते पैय्यारत्न महाथेरो यांनी केले.
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पूर्णा शहरातील बुद्ध विहारात नुकताच धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भदंत पैय्यारत्न महाथेरो बोलत होते. यावेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत पैय्यारत्न, भंते पैय्यावंश, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, ॲड. हर्षवर्धन गायकवाड, अशोक कांबळेंची उपस्थिती होती. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले. यशस्वीतेसाठी अमृतराव मोरे, व्ही.आर. काळे, टी.झेड. कांबळे, दिलीप गायकवाड, मुंजाजी खंदारे, मुंजाजी गायकवाड, त्र्यंंबक कांबळे, अतुल गवळी, उमेश बराटे, अमृत कराळे, पी.जी. रणवीर, शिवाजी थोरात, विजय जोंधळे आदींनी प्रयत्न केले. श्रीकांत हिवाळे यांनी सूत्रसंचालन केले.