शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर परभणीतून लढणार; तटकरेंकडून शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 16:52 IST

Parbhani Lok Sabha: महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

Mahadev Jankar ( Marathi News ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबत जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र ते नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम होता. मात्र आज महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. महायुतीच्या जागावाटपात परभणीची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. मात्र महायुतीचं व्यापक हित लक्षात घेत आम्ही ही जागा महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय घेतला असून तेच या मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी यापूर्वीच रायगडमधून माझी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत आम्हाला सात ते आठ जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. मात्र इतर जागांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. परभणीची जागाही आम्हाला सोडण्यात आली होती. परंतु महादेव जानकर यांचं गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मोठं राजकीय आणि सामाजिक काम आहे. त्यामुळे आम्ही परभणीची जागा त्यांना देण्याचा निर्यण घेतला आहे," असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.

"महायुतीतील सर्व पक्षांचे आभार"

परभणी लोकसभा मतदारसंघ रासपला सोडल्याबद्दल महादेव जानकर यांनी महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची सर्व टीम, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या सर्वांचा मी ऋणी आहे," असं जानकर यांनी म्हटलं आहे.

राजेश विटेकरांचं नाव होतं चर्चेत

परभणी लोकसभेची जागा महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्यास राजेश विटेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती.  या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजय उर्फ बंडू जाधव हे विद्यमान खासदार आहेत. मात्र मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी जाधव यांना चांगली लढत दिली होती. त्यामुळे महायुतीकडून यंदा राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. परंतु आता महादेव जानकरांच्या महायुतीतील समावेशाने विटेकर यांचा पत्ता कट झाला आहे. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेparbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४