भरदिवसा घरफोडी करून सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 19:43 IST2018-06-29T19:42:07+5:302018-06-29T19:43:17+5:30
भरदिवसा घरफोडी करून चोरट्यानी रोख रकमेसह सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली.

भरदिवसा घरफोडी करून सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविला
गंगाखेड (परभणी ) : भरदिवसा घरफोडी करून चोरट्यानी रोख रकमेसह सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली.
तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी आश्रोबा बाबुराव बिडगर व त्यांच्या घरातील सदस्य गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता घराला कुलुप लावुन शेतात कामासाठी गेले होते. यानंतर दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख चाळीस हजार रुपय व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेनंतर परभणी येथुन श्वान पथक, फिंगर प्रिंट घेणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र दोन्ही पथकाला काही ठोस हाती लागले नाही. याप्रकरणी बिडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, जमादार निलेश जाधव हे करत आहेत.