परभणीत सार्वजनिक शौचालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:01 IST2018-01-16T00:01:38+5:302018-01-16T00:01:52+5:30

सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत असल्याने संतप्त नागरिकांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालयाला चक्क कुलूप ठोकले आहे.

Locked to Parbhani public toilets | परभणीत सार्वजनिक शौचालयाला ठोकले कुलूप

परभणीत सार्वजनिक शौचालयाला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत असल्याने संतप्त नागरिकांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालयाला चक्क कुलूप ठोकले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने परभणी शहरात विविध भागात सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली होती. शहरातील शांतीदूतनगर खंडोबा बाजार परिसरातही सार्वजनिक स्वच्छतागृहाची बांधणी करण्यात आली. या शौचालयाचे आऊटलेट याच परिसरात असलेल्या मैदानात सोडण्यात आले. त्यामुळे शौचालयातील घाण पाणी मैदानाशेजारी असलेल्या वसाहतीत घुसून परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, ११ जानेवारी रोजी राष्टÑवादी महिला आघाडीच्या शहर शाखेने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन आऊटलेटच्या पाण्याचा पर्यायी बंदोबस्त करावा, अशी मागणी आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, गंगासागर वाळवंटे, सुमित्रा लझडे आदींनी केली होती. शौचालयातील आऊटलेटच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे, असेही निवेदनात नमूद केले होते. मात्र मनपाने कारवाई केली नाही. त्यामुळे १५ जानेवारी रोजी सकाळी परिसरातील महिला व नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाला कुलूप ठोकले आहे.

Web Title: Locked to Parbhani public toilets