शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कर्जमाफीचे पैसे खात्यावर जमा होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही; अजित पवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 7:29 PM

लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळा घालणारे हे सरकार शेतकरी विरोधी असून, जोपर्यंत कर्जमाफीची रक्कम संपूर्ण शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील सभागृह चालू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जिंतूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना दिला़ 

ठळक मुद्दे अजित पवार यांनी राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढविला़शेतक-यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला वठणीवर आणूत, असा इशाराही त्यांनी दिला़ डिसेंबर रोजी यवतमाळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणारनागपुरात या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मार्गदर्शन करणार आहेत़ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिंतूर (जि़. परभणी) - लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळा घालणारे हे सरकार शेतकरी विरोधी असून, जोपर्यंत कर्जमाफीची रक्कम संपूर्ण शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील सभागृह चालू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जिंतूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना दिला़ 

जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी मोर्चेक-यांना मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते़ व्यासपीठावर आ़ विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ रामराव वडकुते, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, सुरेश जाधव, माजी मंत्री फौजिया खान, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर आदींची उपस्थिती होती़

यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढविला़ शेवगाव येथे ऊस दरासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-या शेतक-यांवर या निर्दयी सरकारने गोळ्या झाडल्या, त्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले़ घरामधील महिलांना बाहेर काढून पुरुष पोलिसांनी मारहाण केली, एवढेच नव्हे तर सलूनमध्ये बसलेल्या ग्राहकांनाही बाहेर काढून मारहाण करीत पोलिसांनी गाडीत टाकले़ त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल केला़ आता मुंबईत रेल्वे दादºयावर जे नागरिक मरण पावले त्यांच्या ३०२ च्या खुनाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा? राज्यात ६७ हजार बालके कुपोषणाने मरण पावले़ त्यांचा ३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा सवालही त्यांनी केला़ सरकारची ही ठोकशाही व हुकूमशाही चालू देणार नाही़़ शेतक-यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला वठणीवर आणूत, असा इशाराही त्यांनी दिला़

यानंतर ते म्हणाले, कोपर्डी प्रकरणात एक वर्षाच्या आत न्याय देऊत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते़ सव्वा वर्षे उलटले तरी या प्रकरणी अद्याप न्याय मिळालेला नाही़ ओठात राम आणि पोटात नथूराम अशी भूमिका या राज्य सरकारची आहे़ गांंधीजींची हत्या करणाºया नथुरामाची पुतळे येथे उभारली जात आहेत़ नोटाबंदीने अनेकांच्या नोकºया गेल्या़ विकासदर खालावला़ रांगेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला़ याला जबाबदार कोण? कॅशलेस व्यवहाराच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत़ याचा आता जनतेनेही विचार करण्याची गरज आहे़ शेजारच्या तेलंगणा राज्यात शेतक-यांना २४ तास वीजपुरवठा दिला जातो़ येथे मात्र शेतक-यांचा वीजपुरवठा खंडीत केला जातो़ 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्याच योगी सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिली़ येथे मात्र अनेक अटी शेतक-यांना घातल्या जातात़ नुसत्याच कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात़ या घोषणेला चार महिने झाले, परंतु, अद्यापपर्यंत एकाही शेतक-याला त्याचा लाभ मिळाला नाही़ आता ग्रीन लिस्ट, येलो लिस्ट, रेड लिस्ट तयार केली जात आहे़ आम्ही फक्त सिग्नललाच हे रंग बघितले होते़ परंतु, या रंगाच्या नावाखाली शेतक-यांना वेठीस धरले जात आहे़ त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील सभागृह चालू देणार नाही, असा आक्रमक इशाराही त्यांनी यावेळी दिला़ १ डिसेंबर रोजी यवतमाळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असून, नागपुरात या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मार्गदर्शन करणार आहेत़ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर पळता भुई थोडी करीऩ़दोन वर्षे समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदतीचा हात देण्याऐवजी हे सरकार त्यांची अडवणूक करण्याची भूमिका घेत आहे़ यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने विहीर, नदी, बंधाºयात पाणी साचले आहे़ परंतु़ सरकारकडून वीज पुरवठा खंडीत केला जात आहे़ त्यामुळे शेतक-यांना वेठीस धरून त्यांचा वीजपुरवठा खंडीत करीत असाल तर याद राखा, तुम्हाला पळता भुई थोडी करीन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला़ 

दुटप्पी भूमिका चालणार नाही़ शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत म्हणून एकीकडे विविध विभागांचा निधी कपात करायचा आणि दुसरीकडे बँकांना दोन लाख कोटी रुपये द्यायचे, हे कशासाठी? विजय मल्ल्याने साडेनऊ हजार कोटी रुपये बुडविले़ त्याचे काय केले? असा सवालही त्यांनी केला़ शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, राज्यात सत्तेतही रहायचे आणि विरोधही केल्याचे दाखवायचे अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही़ त्यामुळे जनतेनेच त्यांना आता इंगा दाखविला पाहिजे़ 

दीड लाख कोटींचे कर्ज घेतले१९६० ते २०१४ पर्यंत राज्यावर २ लाख ९० हजार कोटी रुपयांचे कर्ज होते़ परंतु, या राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत दीड लाख कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर केले आहे़ आता जवळपास साडेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर झाले आहे़ मग घेतलेल्या कर्जातून कुठे बंधारे, इमारती बांधल्या, रस्ते तयार केले, मोठे प्रकल्प विकसित केले हे सांगावे, असा सवाल करून अजित पवार म्हणाले की, केवळ एका व्यक्तीच्या हट्टापायी सव्वा लाख कोटी रुपये खर्च करून मुंबईहून अहमदाबादसाठी बुलेट ट्रेन चालू करण्याचा घाट घातला जात आहे़ सर्वसामान्यांना याच्याशी काहीही देणे-घेणे नाही़ आहे त्या ट्रेनमध्ये चांगल्या सुविधा द्या, असेही ते म्हणाले़ 

आमदार फोडण्यासाठी पैसे आले कोठून?सरकारमध्ये असलेल्याच शिवसेनेचे आमदार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ५ कोटी रुपये भाजपात प्रवेश करण्यासाठी आॅफर दिल्याचा आरोप केला़ अन्य ३० आमदारांनाही भाजपात आणण्यासाठी ५ कोटींप्रमाणे पैसे देऊत, असे सांगितले़ मग या ३० आमदारांसाठी दीडशे कोटी रुपये कोठून आणले हे जाहीर करावे़ फोडाफोडीचे हे राजकारण आम्ही कधीही केले नाही़ हेच चंद्रकांत पाटील मीडियाला मॅनेज करण्यासाठी रस्त्यांकरीता डांबर अर्धे टाकून पैसे द्या, असे सांगतात़ असले घाणेरडे राजकारण राज्यात कधीही झाले नाही, असा आरोपही त्यांनी केला.