६२० जणांना दिली कोविडची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST2021-02-25T04:20:19+5:302021-02-25T04:20:19+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक गंगाखेड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. त्या अनुषंगाने येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा ...

६२० जणांना दिली कोविडची लस
जिल्ह्यात सर्वाधिक गंगाखेड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. त्या अनुषंगाने येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर योग्य तो उपचार करून त्यांना या महामारीतून मुक्त केले. त्यानंतर राज्यामध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर प्रथम आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्या अनुषंगाने येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ६२० जणांना ही लस देण्यात आली आहे. यानंतर आता आशा वर्कर्स, मदतनीस, पोलीस कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने ही लस देण्यात येणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही लस देण्यात येत आहे. लसीचा पुरवठा होईल तसा ही लस टोचण्यात येत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी दोन केंद्रांकडे आतापर्यंत ४०० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे २०० व महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे २०० लसी पाठविण्यात आल्या आहेत.