उधारीवरून हॉटेल चालकावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:46+5:302021-02-05T06:04:46+5:30
शहरातील दिलकश चौक परिसरात असलेल्या चिकन बिर्याणीच्या हॉटेलमध्ये २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जेवणासाठी आलेल्या आवेस खान ...

उधारीवरून हॉटेल चालकावर चाकू हल्ला
शहरातील दिलकश चौक परिसरात असलेल्या चिकन बिर्याणीच्या हॉटेलमध्ये २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जेवणासाठी आलेल्या आवेस खान गफार खान पठाण (रा. नेहरु पुतळा परिसर, गंगाखेड), मैनू मुसा कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला) यांनी हॉटेल चालक शेख अतिक शेख नसिर यास उधार जेवण मागितले. माझा धंदा छोटा आहे मी उधार देऊ शकत नाही, असे हॉटेल चालक शेख अतिक यांनी त्यांना सांगितले. तेव्हा या दोघांनी ही त्यास शिवीगाळ सुरू केली. हॉटेलमध्ये ग्राहक असल्याने हॉटेल चालक शेख अतिक हॉटेल बाहेर येताच आवेस खान याने चाकूने शेख अतिक यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यानंतर शेख अतिक खाली बसताच आवेस खान व मैनू कुरेशी या दोघांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या एहसान खान यास ही दोघांनी शिविगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आमच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी देत दोघे ही निघून गेल्याची फिर्याद हॉटेल चालक शेख अतिक शेख नसिर (३५,रा. महेबूब नगर गंगाखेड) यांनी दिल्यावरून दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार रंगनाथ देवकर, एकनाथ आळसे हे करीत आहेत.