जेसीबीचा धक्का बसल्याने बोरीजवळ जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 19:33 IST2021-06-24T19:33:20+5:302021-06-24T19:33:58+5:30
परभणी-जिंतूर महामार्गावरील कालव्यावरील पुलाचे काम सुरू असताना बाजूला असलेली जलवाहिनी जेसीबीचा धक्का लागल्याने फुटली.

जेसीबीचा धक्का बसल्याने बोरीजवळ जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाहून
बोरी : बोरी गावाजवळील महानुभव आश्रमाजवळ परभणी-जिंतूर रस्त्याचे काम सुरु असताना जेसीबीचा धक्का लागल्याने येलदरीहून परभणीकडे जाणारी जलवाहिनी आज दुपारी तीन वाजता फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परभणी-जिंतूर महामार्गावरील कालव्यावरील पुलाचे काम सुरू असताना बाजूला असलेली जलवाहिनी जेसीबीचा धक्का लागल्याने फुटली. वाहणारे पाणी कालव्यात सोडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही. दरम्यान, रस्त्याचे काम करत असलेल्या ठेकेदाराने परभणी महानगर पालिकेला जलवाहिनी फुटल्याची माहिती दिली. महानगरपालिकेच्या पथक तातडीने बोरी येथील करपरा व झरी दुधना नदीतील वॉल बंद करून पाण्याचा दाब कमी केला. जलवाहिनीचे दुरुस्तीचे उद्या हाती घेणार असल्याची माहिती पथकाने दिली. या पथकामध्ये अभियंता विशाल ओझा, राम कदम, मिर्झा बेग यांचा समावेश आहे.