परभणी जिल्ह्यातील जवान रामदास धुळगंडे गडचिरोलीत शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:16 IST2019-05-10T15:14:29+5:302019-05-10T15:16:52+5:30
गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती आहे.

परभणी जिल्ह्यातील जवान रामदास धुळगंडे गडचिरोलीत शहीद
पालम (परभणी ) : तालुक्यातील पेंडू (बू ) येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान रामदास शिवदास धुळगंडे (३२) हे गुरुवारी (दि. ९ ) सायंकाळी ५ वाजता गडचिरोली येथेशहीद झाले. याबाबत पोलिसांनी रामदास यांच्या नातेवाईकांना माहिती दिली.
शहीद जवान रामदास धुळगंडे हे सन २०१० मधे राज्य राखीव दलात सहभागी झाले होते. त्यांना लहानपणापासून देशसेवा करण्याची आवड होती. यातूनच प्रचंड मेहनतीनंतर त्यांनी राज्य राखीव दलात प्रवेश मिळवला. मागील काही दिवसांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील बोरीपली येथे कार्यरत होते. येथेच गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ, दोन बहीणी असा परिवार आहे. याबाबत पोलिसांनी रामदास यांच्या कुटुंबियांना माहिती दिली असून ते पार्थिव घेण्यासाठी गडचिरोली येथे दाखल झाले आहेत.