शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा मृत्यू होताच पती 'अ‍ॅम्ब्युलन्स आणतो' असे सांगून गायब; ४ दिवस मृतदेह रुग्णालयात पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:49 IST

साता जन्माची शपथ अन् अर्ध्या वाटेतच सोडली साथ! जालन्यातील 'त्या' मृत पत्नीची करुण कहाणी; पतीचा शोध सुरू

- रेवणअप्पा साळेगावकर 

सेलू: साता जन्माची साथ देण्याची शपथ घेऊन विवाहबद्ध झालेल्या एका पतीने, पत्नीचा मृत्यू होताच तिची साथ सोडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पिंकी मोहन शिरके (३५, रा. सेलू) यांचा मृत्यू होताच, 'अ‍ॅम्ब्युलन्स आणतो' असे सांगून गेलेला पती पुन्हा परतलाच नाही. शेवटी चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांनी आणि नगरपालिका प्रशासनाने या दुर्दैवी महिलेवर अंत्यसंस्कार केले.

अ‍ॅम्ब्युलन्सच्या बहाण्याने पलायनसेलू येथील रहिवासी असलेल्या पिंकी शिरके यांना १६ फेब्रुवारी रोजी पती मोहन शिरके यांनी जालना सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान पिंकी यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ही माहिती देताच, "मी प्रेत नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन येतो," असे सांगून मोहन शिरके बाहेर पडले, ते कायमचेच गायब झाले.

नातेवाईकांचा पत्ता नाही, पोलिसांची धडपडमुलगी बेडवर एकटीच पडून राहिल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. पोलीस हवालदार कैलास जायभाये यांनी तातडीने सेलू गाठून नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सेलू पोलिसांच्या मदतीने सोशल मीडिया आणि बिट जमादारांमार्फत ही माहिती तालुकाभर पसरवण्यात आली, मात्र एकही नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी पुढे आला नाही.

अखेर प्रशासनानेच दिले अग्नीशुक्रवारी (२० फेब्रुवारी) मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ताप आणि मानेच्या आजारामुळे पिंकी यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून पोलिसांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर दुपारी ३ वाजता रामतीर्थ स्मशानभूमीत पालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने पिंकी शिरके यांच्यावर अंत्यसंस्कार उरकले.

आरोग्य यंत्रणेच्या त्रुटीवर प्रश्नचिन्हया घटनेमुळे आरोग्य यंत्रणेतील त्रुटीही समोर आल्या आहेत. रुग्ण दाखल करताना सोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा आधारकार्डची नोंद का घेतली गेली नाही? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर या नोंदी वेळेवर झाल्या असत्या, तर कदाचित पतीने असे पळ काढण्याचे धाडस केले नसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband Abandons Wife's Body; Police Perform Last Rites After Four Days

Web Summary : After his wife's death in Jalna, a husband disappeared, leaving her body unclaimed. Police, unable to locate relatives, performed the final rites. The incident raises questions about hospital registration procedures.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीJalanaजालना