थकीत वेतनासाठी आयटकचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:45+5:302021-02-05T06:05:45+5:30
या आंदोलनात आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, सरचिटणीस कॉ. माधुरी क्षीरसागर, विश्वनाथ गवारे, आशा तिडके, बानोबी शेख, तस्लीम ...

थकीत वेतनासाठी आयटकचे आंदोलन
या आंदोलनात आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, सरचिटणीस कॉ. माधुरी क्षीरसागर, विश्वनाथ गवारे, आशा तिडके, बानोबी शेख, तस्लीम पठाण, अस्मा शेख, सुनंदा पत्रे, उद्धव चाफाकानडे, एम. डी. काळे, आर. डी. कुंभार, जयश्री वाडेकर, मीनाक्षी धोत्रे, रेणुका ढगे, शोभा जाधव, रुक्मीण कोल्हे, गंगासागर हारकळ आदींसह आशा, गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यातील ७० हजार आशा वर्कर महिलांना शासनाने घोषित केलेली सुधारित वेतनश्रेणी लागू करून १५ हजार ५०० रुपये किमान वेतन द्यावे, गटप्रवर्तक महिलांना दरमहा १८ हजार रुपये मोबदला आणि ७ हजार ५०० रुपये प्रवासभत्ता द्यावा, आशा व गटप्रवर्तकांना १५ जानेवारी रोजी केलेल्या निवडणूक कामाचा ५०० रुपये भत्ता खात्यात जमा करावा आदी १६ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.