कामधेनू आयोगाच्या अध्यक्षांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:26+5:302021-02-06T04:30:26+5:30
विद्यापीठाच्या वतीने पशुशक्तीवर चालणारे यंत्र रोटरी मोड, अग्र प्रोसेसिंग युनिट, सौरऊर्जेवर चालणारे बैलचलित फवारणी यंत्रे आदींची भारतीय कामधेनू आयोगाचे ...

कामधेनू आयोगाच्या अध्यक्षांनी केली पाहणी
विद्यापीठाच्या वतीने पशुशक्तीवर चालणारे यंत्र रोटरी मोड, अग्र प्रोसेसिंग युनिट, सौरऊर्जेवर चालणारे बैलचलित फवारणी यंत्रे आदींची भारतीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ.सुनील मानिसंगा यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावैळी अपारंपरिक ऊर्जा विभागाचे प्रमुख डॉ.राहुल रामटेके यांनी याबद्दल माहिती दिली, तसेच अजय वाघमारे यांनी रोटरी मोडचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी, यवतमाळचे सुभाष शर्मा, सत्यनारायण सोनी, राजेशसिंग ठाकूर, शिवप्रसाद कोरे, राजेंद्र सोनी, महेश सोनी, लोया, रासवे, डॉ.चौधरी, दत्ता पहारे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ.मानसिंगा व न्या.जोशी यांनी बैलचलित औजार यंत्राची प्रशंसा केली. यावेळी दीपक यंदे, भारत खटींग, रूपेश काकडे, पवार, आव्हाड, अनिल हरकळ, अशुतोष काकडे आदींची उपस्थिती होती.