परभणी जिलञह्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचे पाडस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:36 IST2018-04-28T00:36:19+5:302018-04-28T00:36:19+5:30
पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या एका हरणाच्या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. त्यात हरिणाचे अडीच महिन्यांचे एक पाडस जखमी झाले आहे.

परभणी जिलञह्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचे पाडस जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या एका हरणाच्या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. त्यात हरिणाचे अडीच महिन्यांचे एक पाडस जखमी झाले आहे.
२६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास खळी शिवारात हरणांचा एक कळप पाण्याच्या शोधात शिरला. कुत्र्यांनी या कळपावर हल्ला चढविला. तेव्हा चपळ हरणांनी धूम ठोकली. मात्र एका हरणाचे पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले. याचवेळी लक्ष्मण जाधव हे त्यांच्या शेळ्या घराकडे नेत असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून जखमी पाडसाला ताब्यात घेतले. २७ एप्रिल रोजी सकाळी जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम, माऊली घुलेश्वर, देविदास जाधव, सचिन जाधव यांच्या मदतीने गंगाखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात या पाडसाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. श्रीनिवास कार्ले यांनी उपचार करुन हे पाडस वनअधिकारी सीमा राठोड यांच्याकडे स्वाधीन केले.