तुती बागेत अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:45+5:302021-02-05T06:06:45+5:30

पहाटे वाढला गारठा परभणी : जिल्ह्यात दिवसभरात तापमान वाढलेले असले तरी पहाटेच्या सुमारास मात्र वातावरणात चांगलाच गारवा निर्माण होत ...

Infestation of larvae in mulberry garden | तुती बागेत अळीचा प्रादुर्भाव

तुती बागेत अळीचा प्रादुर्भाव

पहाटे वाढला गारठा

परभणी : जिल्ह्यात दिवसभरात तापमान वाढलेले असले तरी पहाटेच्या सुमारास मात्र वातावरणात चांगलाच गारवा निर्माण होत आहे. अचानक वातावरणामध्ये बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे.

महात्मा गांधी यांना अभिवादन

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, प्रवीण कोकांडे, आदींची उपस्थिती होती.

पोलीस चौक्यांची दुरवस्था

परभणी : शहरातील विविध भागांत निर्माण केलेल्या पोलीस चौक्या सध्या बंद अवस्थेत आहेत. पोलीस ठाण्यांतर्गत कार्यक्षेत्र मोठे असल्याने नागरिकांना तातडीने पोलिसांशी संपर्क करता यावा, यासाठी विविध भागांत पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली होती. सद्य:स्थितीला नानलपेठ पोलीस ठाण्यांतर्गत विसावा कॉर्नर येथील पोलीस चौकी वगळता इतर चौक्या बंद आहेत. शहरातील उड्डाणपुलाच्या खाली तसेच जुना मोंढा भागातील पोलीस चौकी बंद आहे. त्याचप्रमाणे परभणी बसस्थानकावरील पोलीस चौकीही बंद आहे.

नालीवर टाकला स्लॅब

परभणी : शहरातील कृषी सारथी कॉलनी भागात वसमत रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील नालीवरील स्लॅब तुटला होता. मनपा प्रशासनाने या ठिकाणी नवीन स्लॅब टाकला असून, वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे.

Web Title: Infestation of larvae in mulberry garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.