जिल्ह्यात संसर्ग वाढला ५५ नव्या रुग्णांची भर ; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:41+5:302021-02-25T04:21:41+5:30
विदर्भामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील रुग्णांची ...

जिल्ह्यात संसर्ग वाढला ५५ नव्या रुग्णांची भर ; एकाचा मृत्यू
विदर्भामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी नियंत्रणात असलेला कोरोना आता मात्र वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. २४ फेब्रुवारी रोजी ८८० नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले, त्यामध्ये ७९७ नागरिकांच्या आरटीपीसीआर अहवालात ६० जण पॉझिटिव्ह आहेत. तर रॅपिड टेस्ट केलेल्या ८३ नागरिकांपैकी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा बुधवारी मृत्यू झाला. रुग्णसंख्येत झालेली वाढ आणि उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढत आहे.
जिल्ह्यात ८ हजार ३७४ एकूण रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ७ हजार ८०३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ३२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २४९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. परभणीतील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४८ तर खासगी रुग्णालयात ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १५२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
१० रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील दहा रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे बुधवारी या रुग्णांना सुटी देऊन कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले.