शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
3
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
7
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
8
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
9
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
10
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
11
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
13
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
14
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
15
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
16
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
17
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
18
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
19
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
20
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही? पुरात उभे राहून भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:32 IST

शेतकऱ्यांनी दिला मोठा इशारा! आमदार, खासदारांना फिरकू न देण्याची भूमिका.

चुडावा (जि. परभणी): पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात अतिवृष्टी, पुरामुळे खरीप पिके वाहून गेली. पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करू नये, उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही, असा संतप्त सवाल करत चुडावा मंडळातील शेतकऱ्यांनी शनिवारी पुराच्या पाण्यात जावून हेक्टरी १३ हजार ५०० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.

पूर्णा तालुक्यातच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी, पुरामुळे खरीप पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शासनाला कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्राला, देशाला नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करू नका, एकीकडे उद्योगपतींची कर्ज माफ होते. शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा, आठवा वेतन आयोग लागू होतो. आमदार खासदारांनाही लाखांच्यावर मानधन आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ का नाही, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला.

आमदार, खासदारांना फिरू देणार नाहीसध्या चुडावा मंडळातील सर्व पिके नष्ट झाली असून, सरकारने याची दखल घ्यावी, शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा, कर्जमाफी, हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची भरपाई द्या, अन्यथा महाष्ट्रात एकाही आमदार, खासदारांना फिरू न देण्याचा इशारा प्रेम देसाई, शत्रुगुन देसाई, शहाजी देसाई, हानवता देसाई शेतकऱ्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Demand Compensation After Crop Loss: Why Not Loan Waivers?

Web Summary : Parbhani farmers, devastated by crop loss due to floods, demand ₹13,500/hectare compensation. They question why industrialists' loans are waived but not farmers', threatening to block politicians if demands aren't met.
टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र