शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

परभणी जिल्ह्यातील २० रस्त्यांचा दर्जा वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:19 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकास अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४८.८० कि.मी.लांबीच्या २० रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे यांच्या वतीने ३० आॅक्टोबर २०१८ रोजी पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने या प्रस्तावास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता पूर्णा तालुक्यातील ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा या २.५ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ३८ लाख ४ हजार रुपयांची अंदाजित रक्कम लागणार असून ५ वर्षे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ८ लाख ४ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६२ ते महातपुरी या २ कि.मी.च्या रस्त्यासाठी १ कोटी १९ लाख ६ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या ५ वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख ८४ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. परभणी तालुक्यातील माळसोन्ना ते धसाडी या ३.६४ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी अंदाजित २ कोटी ६७ लाख ९ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ वर्षांकरीता १२ लाख ७४ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. राज्यमार्ग २२२ ते किन्होळा या २.२५ कि.मी.रस्त्यासाठी अंदाजित १ कोटी ५१ लाख ६ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख ८८ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. प्रजिमा ३१ ते ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव या २.८५ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ६४ लाख १ हजार रुपयांचा निधी लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी ९ लाख ९८ हजार रुपये अंदाजित रक्कम लागणार आहे. मानवत तालुक्यातील भोसा ते लोहरा या २ कि.मी. रस्त्यासाठी ९६ लाख ९८ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख रुपये लागणार आहेत. पूर्णा तालुक्यातील ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा या २.१ कि.मी.रस्त्यासाठी १ कोटी ७३ लाख ५ हजार रुपये लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख ३५ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६२ ते महातपुरी या ३.७५ कि.मी.रस्त्यासाठी ३ कोटी १६ लाख ८ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी १३ लाख १३ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा या ०.८ कि.मी. रस्त्यासाठी ५१ लाख २८ हजार रुपये लागणार असून दुरुस्तीसाठी २ लाख ८ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. परभणी तालुक्यातील माळसोन्ना ते धसाडी या २.५ कि.मी.रस्त्यासाठी १ कोटी १७ लाख ५ हजार, राज्यमार्ग २२२ ते किन्होळा २ कि.मी.रस्त्यासाठी १ कोटी १२ लाख ६ हजार, प्रजिमा ३१ ते ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव या २.१ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ९ लाख ३ हजार रुपये लागणार आहेत. या तिन्ही रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुक्रमे ७ लाख १८ हजार, ७ लाख व ७ लाख ३५ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. मानवत तालुक्यातील भोसा ते लोहरा या व्हीआर ३१-०३ या २.११ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ४८ लाख २ हजार रुपये लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी २ लाख ८ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६५ ते महातपुरी व्हीआर ६१- ६ या १.२ कि.मी.रस्त्यासाठी ९० लाख ४७ हजार रुपये लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी ४ लाख २ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. परभणी तालुक्यातील माळसोन्ना ते धसाडी ओडीआर २०-८ या ३ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी २९ लाख ६ हजार रुपये, राज्य मार्ग २२२ ते किन्होळा व्हीआर ४-५० या २.८ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी २० लाख ६ हजार, प्रजिमा ३१ ते ब्रह्मपुरी ते पेडगाव व्हीआर ५.५१ या १.८ कि.मी.रस्त्यासाठी ७७ लाख ४१ हजार रुपये लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुक्रमे १० लाख ५ हजार, ९ लाख ८ हजार आणि ६ लाख ३ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. मानवत तालुक्यातील भोसा ते लोहरा व्हीआर ३१-३ या ३ कि.मी.रस्त्यासाठी २ कोटी २३ लाख ४ हजार, पूर्णा तालुक्यातील ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा व्हीआर ६२ -२१ या १.९ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ५५ लाख ४ हजार आणि ग्रामीण मार्ग ६२ ते महातपुरी व्हीआर ६१-६ या १.४ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ११ लाख २ हजार रुपये लागणार आहेत. या तिन्ही रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुक्रमे १० लाख ५ हजार, ६ लाख ६५ हजार आणि ४ लाख ९ हजार रुपये ५ वर्षांसाठी लागणार आहेत.अंदाजपत्रकातील माहिती : मराठीतूनच द्यावी लागणार४या कामासंदर्भातील अंदाजपत्रकातील माहिती मराठीमधून द्यावी व तशा फलकाची तरतूदही संबंधित कंत्राटदाराने करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. रस्त्याच्या कामांना तांत्रिक मान्यता प्रदान करण्यापूर्वी कामाचा वाव, निधी वितरणाचे स्वरुप, हॅड्रोलिक कॅक्यूलेशन आदी बाबींची पडताळणी पूर्ण करुन संकल्प निश्चित करावे. या रस्त्यासाठी लागणारी जमीन संबंधित विभागाच्या ताब्यात आहे, याची खातर करावी, सदरील जमीन खाजगी किंवा वनविभागाची असेल तर नाहरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय काम हाती घेऊ नये, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.अद्ययावत दरसूचीनुसार तांत्रिक मंजुरीया रस्त्याच्या कामांना २०१८-१९ च्या अद्ययावत दरसूचीनुसार तांत्रिक मंजुरी देण्यात यावी, असे आदेश ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तांत्रिक मान्यता प्रदान करणाºया सक्षम अधिकाºयांनी कामांमध्ये प्रस्तावित बाब अन्य कोणत्याही योजनेत/ कार्यक्रमात समाविष्ट नाही तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपलिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी तत्सम यंत्रणांकडे मंजूर नाही, याची खातरजमा करावी, असेही याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRural Developmentग्रामीण विकासhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक