उसाच्या वाहनांमुळे वाढले अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:23+5:302021-02-05T06:05:23+5:30
पार्किंग सुविधेचा स्थानकावर बोजवारा परभणी: येथील बसस्थानकात नवीन बसपोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी आणि अपुऱ्या जागेत ...

उसाच्या वाहनांमुळे वाढले अपघात
पार्किंग सुविधेचा स्थानकावर बोजवारा
परभणी: येथील बसस्थानकात नवीन बसपोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी आणि अपुऱ्या जागेत बसगाड्या उभ्या केल्या आहेत. नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना वाहने उभी करण्यासाठी या भागात पार्किंगची सुविधा नसल्याने अस्तव्यस्त वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे बसचालकांना या वाहनांचा अडथळा सहन करावा लागत आहे.
जिल्हा स्टेडियममध्ये वाढल्या असुविधा
परभणी: येथील स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झाल्या आहेत. एकाही खेळासाठी सुसज्ज असे ग्राउंड उपलब्ध नाही. त्या प्रमाणे आसन व्यवस्थेच्या ठिकाणी टाकलेले पत्रे उडून गेले आहेत. या शिवाय पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.
उपक्रमशील शिक्षिकेचा पालकांकडून सत्कार
बोरी : जिंतूर तालुक्यातील गणपूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका रत्नमाला एकनाथ शेळके यांनी कोविड १९ मध्ये लॉकडाऊनच्या काळात मुलांसाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण हा उपक्रम राबवून सहा भाषेचे ज्ञान अवगत केले. त्याबद्दल रत्नमाला शेळके यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अर्जुन वजीर, नामदेव काष्टे, शाळेचे मुख्याध्यापक कटारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.