शिवभोजन थाळीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST2021-06-01T04:13:57+5:302021-06-01T04:13:57+5:30

लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब उपाशीपोटी राहू नयेत म्हणून राज्य शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार शहरातील ...

Inauguration of Shiva Bhojan Thali | शिवभोजन थाळीचे उद्घाटन

शिवभोजन थाळीचे उद्घाटन

लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब उपाशीपोटी राहू नयेत म्हणून राज्य शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार शहरातील स्नेहा महिला बचत गटाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोफत शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन रिपाइंच्या महिला जिल्हाध्यक्षा राणूबाई वायवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी दळवी, नायब तहसीलदार कैलास वाघमारे, स्नेहा महिला बचत गटाच्या अध्यक्षा पौर्णिमा मिलिंद लझडे, सुमित्रा गुलाबराव लझडे, महिला राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड, रेणुका गाडे, कांता गवळी, विजय गायकवाड, मुमताज बेगम, सुनीता आठवले, भीमराव वायवळ, मिलिंद लझडे, कपिल लझडे, किरण लझडे, प्रकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती. या मोफत शिवभोजन केंद्राच्या वतीने दररोज १५० गोरगरीब व गरजू नागरिकांना भोजन देण्यात येत आहे.

Web Title: Inauguration of Shiva Bhojan Thali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.