परभणीत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:44 IST2018-09-25T00:44:22+5:302018-09-25T00:44:46+5:30
जिल्हा क्रीडाधिकारी व मनपाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

परभणीत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा क्रीडाधिकारी व मनपाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमास महापौर मीनाताई वरपूडकर, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पुजारी, क्रीडा अधिकारी चंद्रकांत साखरे, शैलेंद्रसिंह गौतम, संतोष ठाकूर, तुकाराम ठोंबरे, मिलिंद घुसळे, राजू कामखेडे, प्रल्हाद राठोड, पहेलवान राम जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी सांगितले की, खेळाडूंनी खेळकर भावनेतून खेळ खेळून जिल्ह्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा. कैलास माने यांनी सूत्रसंचालन केले. असोसिएशनचे सचिन धनंजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयकुमार तिवारी, अजय महाजन, नागसेन अटकोरे, नागेश सुरनर, सचिन सरगर, राहुल बगाटे, धनुष्य बनसोडे, वैभवी शहाणे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमात सायली कनकुटे, धनुष्य बनसोडे, शेख इम्रान, लखन ठाकूर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.