शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत मार्च महिन्यातच तापमानाने गाठली चाळिशी

By राजन मगरुळकर | Updated: March 27, 2024 16:57 IST

वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे. याशिवाय उकाड्यातही वाढ झाली आहे.

परभणी : शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानाने मार्च महिन्यातच चाळिशी गाठली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवनावर दुपारच्या वेळी परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. सलग तीन दिवसांपासून कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सियस नोंद झाले आहे.

परभणी जिल्ह्यात दरवर्षीच तापमान ४० ते ४५ अंशांच्या आत नोंद होत असते. एप्रिल तसेच मे महिन्यात या तापमानाची नोंद होते. यंदा मात्र, मार्च महिन्यातच तापमानात दररोज सातत्याने वाढ होत आहे. परभणी शहर परिसरात रविवारपासून दररोज तापमान ३८ अंशांच्या पुढे सरकले आहे. यामध्ये मंगळवारी ३९.७ तर बुधवारी सुद्धा ३९.७ एवढे तापमान नोंद झाले. कमाल तापमान ४० जवळ तर किमान तापमान हे २५ अंशांवर पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे. याशिवाय उकाड्यातही वाढ झाली आहे. जिल्हाभरात सध्या तापमान वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागातील शेतीच्या कामावर सुद्धा याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

असे होते चार दिवसांचे कमाल तापमानरविवार ३८ अंश सेल्सिअससोमवार ३८.६मंगळवार ३९.७बुधवार ३९.७

या जिल्ह्यात पावसाची शक्यताप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या प्राप्त अंदाजानुसार शनिवारी लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी उष्णता जाणवेल व कमाल तापमानात त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात २९ मार्च ते चार एप्रिल दरम्यान पाऊस कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी