शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

परभणीत पोतराज, गोंधळी, तृतीयपंथीयांच्या आंदोलनाने वेधले लक्ष

By राजन मगरुळकर | Published: August 29, 2022 4:40 PM

मानवतचे बनावट कृषी निविष्ठा प्रकरण : जिल्ह्यातील मानवत येथे ९ ऑगस्ट रोजी बनावट कृषी निविष्ठा पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या.

परभणी : मानवत येथील बनावट कृषी निविष्ठा प्रकरणातील आरोपींवर कृषी कायद्यांतर्गत कृषी विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात पोतराज, गोंधळी आणि तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवून कलांचे सादरीकरण करत घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

जिल्ह्यातील मानवत येथे ९ ऑगस्ट रोजी बनावट कृषी निविष्ठा पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. शेतकरी तसेच काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. मात्र, यात पोलीस तपासात उघड झालेल्या व्यापाऱ्यावर कृषी कायद्यांतर्गत अद्याप स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी बचाव कृती समितीने याबाबत निषेध नोंदविला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोतराज, गोंधळी, तृतीयपंथीयांनी एकत्र येत कार्यालयासमोर काही वेळ लोकगीत, नाच, गाणे गाऊन प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याचा निषेध नोंदविला. आंदोलनात सुनील बावळे, अर्जुन पंडित, रामप्रसाद बोराडे, मारुती साठे, त्रिंबक शेळके, शिवाजी सोनवणे, गणेश देशमुख, रमेश लोखंडे, दीपक गुळवे, उद्धव शिंदे यांचा सहभाग होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले.

या मागण्यांचा समावेशयात बनावट कृषी निविष्ठा निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या औषधी, खते, बियाणे यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात यावी, गुणवत्ता चाचणीत निकृष्ट आढळलेल्या कंपनीच्या सर्व उत्पादनांची विक्री तत्काळ थांबवावी, भेसळयुक्त कृषी निविष्ठा, खते, बियाणे विक्री करणाऱ्यांचे परवाने तत्काळ निलंबित करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. सुमारे अर्धा तास हे निषेध आंदोलन घेण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी