गंगाखेडमध्ये उपवसानिमित्त खालेल्या भगरीतून १९ जणांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:37 IST2024-02-07T16:36:51+5:302024-02-07T16:37:08+5:30
गंगाखेड शहर, तालुक्यातून १९ जण रात्रीतून उपचारासाठी दाखल

गंगाखेडमध्ये उपवसानिमित्त खालेल्या भगरीतून १९ जणांना विषबाधा
- अनिल शेटे
गंगाखेड: गंगाखेड शहर आणि तालुका, पालम परिसरातून आज पहाटे १:३० वाजता भगरीतून विषबाधा झालेले १९ जण उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
विठ्ठलवाडी,शेंडगा, बैदरवाडी, मालेवाडी , झोला,नागठाणा, पालम तालुक्यातील रावराजुर, गंगाखेड शहरातील ओमनगर, सारडा काॅलनी या भागात मंगळवारी एकादशीच्या उपवासानिमित्त भगर खाल्ल्यानंतर काहीजणांना विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.
यात सखुबाई ठवरे,विठ्ठल ठवरे,देविदास ठवरे,संतराम लोखंडे,सोनाली ठवरे,मुजा ठवरे,अनिता गिरी,सरस्वती कुंडगिर, अलका कुंडगिर,देवईबाई कोरडे,पुजा सपकाळ,भाग्यश्री शिंदे,मुद्रीका मुठाळ,अमित अढाव,सिंधु अढाव,विष्णु आंधळे,बाबुराव शिंदे,कांताबाई हंगरगे,भानुदास भडके असे विषबाधा झालेल्या रूग्णाची नावे आहेत.त्याच्यावर उपजिल्हारूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या १९ रूग्णापैकी दोन अनिता गिरि,कांताबाई हंगरगे यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. रूग्णाची प्रकृती सुधारत आहे. वैद्यकिय अधिकारी डाँ. स्नेहल लोहकरे ,परिचारिका आशा डुकरे,माया लाटे,कर्मचारी प्रशांत राठोड आदीनी उपचार केले.