अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST2021-02-23T04:26:16+5:302021-02-23T04:26:16+5:30
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ तलाठी सुभाष होळ यांना भरधाव वेगाने जाताना एक ट्रॅक्टर दिसला. तेव्हा त्यांनी ...

अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडले
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ तलाठी सुभाष होळ यांना भरधाव वेगाने जाताना एक ट्रॅक्टर दिसला. तेव्हा त्यांनी या ट्रॅक्टरला हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर भरधाव वेगाने तिथून निघून गेले. त्यानंतर एका घराच्या भिंतीवर जाऊन आदळला. त्यानंतर तलाठी सुभाष होळ यांनी या ट्रॅक्टरची पाहणी केली असता, त्यामध्ये एक ब्रास वाळू साठा आढळून आला. ज्याची किंमत ५ हजार रुपये आहे. याबाबत चालक सुनील मनोहर भालेराव (रा. गायके पिंपळगाव) यास विचारले असता, त्याने दुधना नदीपात्रातून वाळू उपसा केल्याचे सांगितले. त्यानंतर महसूल प्रशासनाने एम.एच. १५, डी. वाय. ५७१६ तसेच एम. एच. २२, वाय. ११३१ या दोन दुचाकींसह एम. एच. ३८, बी. ८१३ हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतला. त्यानंतर सुनील भालेराव, भिवाजी मानवते, माधव पवार, बबलू गायकवाड, सचिन भालेराव यांच्या विरुद्ध कारवाई करीत एक ब्रास वाळूसह ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.