दैठणा परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST2021-05-11T04:17:54+5:302021-05-11T04:17:54+5:30

दैठणा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातच हे गौण खनिज उत्खनन केले जात आहे. गौण खनिजाचे उत्खनन होत ...

Illegal mining of secondary minerals in Daithana area | दैठणा परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

दैठणा परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

दैठणा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातच हे गौण खनिज उत्खनन केले जात आहे. गौण खनिजाचे उत्खनन होत असलेल्या जागेजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ आहे. त्यामुळे या जलकुंभालाही धोका निर्माण झाला आहे. शिवाय आरोग्य केंद्रातील रुग्णांना ही त्रास सहन करावा लागत आहे. या गौण खनिज उत्खननाचा पंचनामा करून, त्या संदर्भातील अहवाल तलाठ्यांनी तहसीलदारांना सादर केला आहे. मात्र, तहसीलदारांनी अद्याप या प्रकरणात कुठलीही कारवाई केली नाही. अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याने ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अनंता कच्छवे, संदीप कच्छवे, बाळासाहेब कच्छे, हरिभाऊ कच्छवे, सुभाष जाट, प्रताप कच्छवे, बबन कच्छवे, दत्तराव कच्छवे, पमेश्वर पांचाळ आदी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Illegal mining of secondary minerals in Daithana area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.