मास्क न वापरल्यास मनपा करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:24 IST2021-08-17T04:24:34+5:302021-08-17T04:24:34+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला आहे. तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता राज्य ...

मास्क न वापरल्यास मनपा करणार कारवाई
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला आहे. तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता राज्य शासनाने कळविली असून यात बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आस्थापना, व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक, सर्व दुकानदार, सर्व किराणामाल दुकानदार, पेट्रोलपंपचालक, फुलविक्रेते, सराफा विक्रेते, वाहन, विद्युत उपकरणे दुरुस्ती, उपाहारगृहचालक यांनी नियमांचे पालन करावे. यात प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच दुकानात मास्क घालून ग्राहकांना प्रवेश द्यावा, सामाजिक अंतर राखावे, हात धुण्याची व्यवस्था, मालक व कर्मचारी यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक आहे. या बाबींचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली.