जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST2021-02-25T04:20:32+5:302021-02-25T04:20:32+5:30
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आता ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात ...

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आता ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात उपाययोजना सुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या उपस्थितीत रुग्णालयातील अधिकाऱ्यांची बैठक २३ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी अविनाश कुमार यांनी कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र गरजेचे असल्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी, रोजंदारी आणि पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दर्शनी भागात लावूनच रुग्णालयात प्रवेश करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे कर्मचारी ओळखपत्राचा वापर करणार नाहीत, त्यांना १०० रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशाराही जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनी दिला आहे. हा दंड वसूल करण्याची जबाबदारी एन. एस. सरवदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.