Video : परभणीत ट्रॅक्टर गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:09 IST2019-09-09T17:06:28+5:302019-09-09T17:09:06+5:30

अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

huge fire in a tractor godown at Parabhani | Video : परभणीत ट्रॅक्टर गोदामाला भीषण आग

Video : परभणीत ट्रॅक्टर गोदामाला भीषण आग

परभणी- येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील एका ट्रॅक्टर गोदाम व शेती आवजारांच्या गोदामाला आग लागल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी ३़१५ वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली़

जिल्हा स्टेडियम परिसरात कोल्हे ट्रॅक्टर्स हे ट्रॅक्टर विक्रीचे दुकान आणि त्या शेजारीच गोदाम आहे़ सोमवारी दैनंदिन कामकाज सुरू असतानाच अचानक गोदामातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले़ आग लागल्याचे समजताच  दुकान मालकासह सर्व कर्मचारी दुकानाबाहेर पडले़ आगीची माहिती अग्नीशमन दलाला दिल्यानंतर काही वेळेतच अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला़ अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले़ मात्र तोपर्यंत गोदामातील शेती आवजारे, प्लास्टिकचे पाईप, ट्रॅक्टर्सचे सुटे भाग आदी साहित्य जळून खाक झाले़

Web Title: huge fire in a tractor godown at Parabhani