आत्महत्येच्या संशयाने तासभर गाेंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST2020-12-08T04:14:47+5:302020-12-08T04:14:47+5:30

देवगाव फाटा : सेलू येथील सार्वजनिक स्वच्छतागृहातील एका खोलीचा दरवाजा तब्बल एक तास बंद राहिल्याने या खोलीत कोणीतरी आत्महत्या ...

An hour on suspicion of suicide | आत्महत्येच्या संशयाने तासभर गाेंधळ

आत्महत्येच्या संशयाने तासभर गाेंधळ

देवगाव फाटा : सेलू येथील सार्वजनिक स्वच्छतागृहातील एका खोलीचा दरवाजा तब्बल एक तास बंद राहिल्याने या खोलीत कोणीतरी आत्महत्या केली असावी, या संशयाने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलीस कर्मचाऱ्यांनी बंद दार उघडले असता, आतमध्ये कोणीही नसल्याचे स्पष्ट झाल्याने या गोंधळावर पडदा पडला. हा सर्व प्रकार ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला.

सेलू बसस्थानकातील सुलभ शौचालयाचा दरवाजा सोमवारी दुपारी ४ वाजेपासून आतमधून बंद होता. तब्बल एक तासापर्यंत प्रतीक्षा केल्यानंतरदेखील कोणीही बाहेर येत नसल्याने शौचालयात आत्महत्या केली असावी, असा संशय निर्माण झाला. त्यामुळे या परिसरात बघ्यांची गर्दी जमली. अखेर सुलभ शौचालयचालकांनी ही माहिती पोलिसांना दिली. सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास जमादार संजय साळवे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडण्याऐवजी शौचालयाच्या खिडकीतून आत प्रवेश करीत दरवाजा उघडण्यात आला. यावेळी शौचालयात कोणीही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा गोंधळ थांबला.

Web Title: An hour on suspicion of suicide