राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्धांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST2021-06-11T04:13:13+5:302021-06-11T04:13:13+5:30

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. सुरेश जाधव व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते सकाळी १०.१० वाजता ध्वजारोहण करण्यात ...

Honor of Corona Warriors on the occasion of NCP's anniversary | राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्धांचा गौरव

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्धांचा गौरव

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. सुरेश जाधव व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते सकाळी १०.१० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी ५० जणांनी पक्षात प्रवेश केला. त्यांचा जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर गरजूंना पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाबाधित मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, डॉ.संजय रोडगे, जलील पटेल, प्रा.सुरेंद्र रोडगे, नंदाताई राठोड, डॉ. अनिल काणे, नगरसेवक इम्रान हुसैनी, किरण तळेकर, सिद्धांत हाके, कृष्णा कटारे, सुमंत वाघ, दीपक कांबळे, संदीप माटेगावकर, रितेश काळे, कृष्णा दळणार, संगीत कडेकर, एकनाथराव शिंदे, गंगाधर यादव, शेख मुकीम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Honor of Corona Warriors on the occasion of NCP's anniversary