३८ लाखांच्या गुटख्याची केली होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST2020-12-03T04:30:28+5:302020-12-03T04:30:28+5:30
पाथरी तालुक्यातील १३ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल अंदाजे ३८ लाख रुपयांचा गुटखा नष्ट करण्याची परवागनी पाथरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस ...

३८ लाखांच्या गुटख्याची केली होळी
पाथरी तालुक्यातील १३ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल अंदाजे ३८ लाख रुपयांचा गुटखा नष्ट करण्याची परवागनी पाथरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने दोन सरकारी पंचांसमक्ष अन्न व भेसळ कार्यालय परभणी येथील अधिकारी कच्छवे, तमलवाड यांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांच्यासह नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने ३८ लाख रुपयांचा गुटखा बुधवारी नष्ट करण्यात आला.
दरम्यान, पाथरी तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून गुटख्याची वाहतूक वाढली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत आहे. मागील दोन वर्षांत ३८ लाखांचा गुटखा जप्त करून त्याची होळी करण्यात आली. त्यामुळे गुटखामाफियांचे धाबे दणाणले आहेत.