सोसाट्याच्या वाऱ्यासह परभणी शहरात जोरदार पाऊस
By राजन मगरुळकर | Updated: April 28, 2024 23:03 IST2024-04-28T23:03:14+5:302024-04-28T23:03:36+5:30
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वातावरणात बदल झाला आणि दहा वाजता या पावसाला सुरुवात झाली. जोरदार वारा चमकणाऱ्या विजा आणि पाऊस रात्रपर्यंत सुरूच होता.

सोसाट्याच्या वाऱ्यासह परभणी शहरात जोरदार पाऊस
परभणी : ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाट सोबतच सोसायट्याच्या वाऱ्यासह परभणी शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी हा पाऊस सुरू झाला. शहरातील सर्व भागातील वीज पुरवठा पाऊस सुरू होताच खंडित झाला. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरू असल्याने शहरवासीयांची धांदल उडाली.
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वातावरणात बदल झाला आणि दहा वाजता या पावसाला सुरुवात झाली. जोरदार वारा चमकणाऱ्या विजा आणि पाऊस रात्रपर्यंत सुरूच होता. शहरासह तालुक्यात सुद्धा या पावसाने हजेरी लावली. दिवसभर शहरामध्ये ४० अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. त्यातच अचानक रात्री वातावरणात बदल होऊन हा जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे वाहनधारकांची सुद्धा तारांबळ उडाली.