उसने पैसे मागण्यास आला, मुक्काम केला अन् घरातच स्वतःला संपवलं
By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 22, 2023 19:22 IST2023-09-22T19:22:21+5:302023-09-22T19:22:30+5:30
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत

उसने पैसे मागण्यास आला, मुक्काम केला अन् घरातच स्वतःला संपवलं
मानवत: तालुक्यातील ताडबोरगाव येथे उसने पैसे मागण्यासाठी आलेल्या ४५ वर्षीय इसामने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी मयत इसम हा ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळत असल्याने मुळ प्रकरण वेगळेच असल्याची चर्चा सुरु आहे.
पोलीस ठाण्यात झालेल्या आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार तालुक्यातील ताडबोरगाव येथील संतोष गणेश कांबळे यांच्या कडे गंगाखेड तालुक्यातील धनगर मोहा येथील सुभाष निराळवाड (वय 45) हे 20 सप्टेंबर रोजी आले होते. त्यांनी कांबळे यांना 3 लाख रुपये उसने मागितले होते. दोन दिवसांनी देतो असे सांगितल्या नंतर सुभाष निराळवाड हे कांबळे यांच्या घरीच मुक्कामाला थांबले.दुसऱ्या दिवशी 21 सप्टेंबर रोजी दुपारी कांबळे यांच्या घरातच कोणत्या तरी कारणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली.संतोष गणेश कांबळे यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
22 सप्टेंबर रोजी मृतदेह परभणी येथे जिल्हा रुग्णालायात नेण्यात आल्याची माहिती पो नी दीपक दंतुलवाड यांनी दिली.तपशीलवार अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.वर वर हे प्रकरण आकस्मिक मृत्यूचे दिसत असले तरी मूळ प्रकरण वेगळेच असल्याचे चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून तपासात कोणत्या बाबी समोर येतात याकडे लक्ष लागले आहे.अधिक तपास पोलीस हवालदार भारत नलावडे करीत आहेत.