परभणीत रॅलीच्या माध्यमातून मांडले अपंगांचे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:05 IST2018-12-03T16:03:23+5:302018-12-03T16:05:01+5:30
मूकबधीर एकता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढून अपंगांचे प्रश्न जिल्हा प्रशासनाच्यासमोर मांडले.

परभणीत रॅलीच्या माध्यमातून मांडले अपंगांचे प्रश्न
परभणी- मूकबधीर एकता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढून अपंगांचे प्रश्न जिल्हा प्रशासनाच्यासमोर मांडले.
जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनच्यावतीने आज (दि. ३ ) शनिवार बाजार येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीत मूकबधीर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इतर अपंगांप्रमाणे हक्क व समानन्याय मिळावा, महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या २०१५-१८ या वर्षातील राखीव निधीचा गैर वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगांच्या खात्यात ३ टक्के निधी त्वरित जमा करावा, दिव्यांगासाठी घरकुल, प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करुन द्यावा, घरपट्टी, नळपट्टीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शनिवार बाजार येथून निघालेली ही रॅली शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ, स्टेशनरोडमार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली.